7 खडक व खडकांचे प्रकार स्वाध्याय सहावी भूगोल
अ) नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते याविषयी माहिती घ्या.
उत्तर :नदीमध्ये पाणी सतत वाहत असते. या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणाऱ्या खडकांची झीज होते. कालांतराने ही खडक फुटतात. त्याचा भुगा होतो. ती वाळू तयार होते. तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून आणते. त्यामुळे नदीत वाळू तयार होते.
ब) खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत ?
1) ताजमहाल. 2) रायगड किल्ला
3) लाल किल्ला 4) वेरूळचे लेणे
उत्तर :रायगड किल्ला
क) फरक नोंदवा
1) अग्निजन्य खडक व स्तरित खडक
उत्तर :अग्निजन्य खडक
i) ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर तप्त लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.
ii) हे खडक वजनाने जड असतात.
iii) अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही.
iv) अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट व ग्रॅनाईट प्रमुख खडक आहेत.
स्तरित खडक
i) गाळाच्या थरांवर एकावर एक असे थर साचत जातात या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यापासून जो खडक तयार होतो. त्याला स्तरित खडक असे म्हणतात.
ii) हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात.
iii) स्तरित खडकांत जीवाश्म आढळतात.
iv) वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म, प्रवाळ हे स्तरित खडक आहेत.
2 स्तरित खडक व रूपांतरित खडक

Comments
Post a Comment